जिल्हा पोलिस दलातील सहा कर्मचारी निलंबित.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी काल बुधवारी (दि.६) दिल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये चार पोलिस नगर येथील असून नेवासा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांचा समावेश आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जिल्हा रुग्णालयात नेमणुकीस असलेले पो. हे. कॉ. दिलीप पडघडमल, पो. कॉ. शहाबाज शेख, पो. कॉ. अनिस शेख, पो. कॉ. दत्तू शिंदे हे कामाच्या वेळेत व ठिकाणी गैरहजर आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तर नेवासा पोलिस ठाण्यातील पो. कॉ. बी. एम. तागड व पो. कॉ. व्ही. व्ही. खिळे यांना निलंबित करण्यात आले असून शेवगाव हत्याकांडातील मुख्य आरोपी अमोल उर्फ संतोष ईश्वर पिंपळे याने कारागृहात आत्महत्या केल्यामुळे याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान या निलंबनामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.