महामार्गावरील मद्यविक्री दुकानाच्या परवाना नूतनीकरणास प्रारंभ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील ५०० व २२० मिटर अंतरावरील मद्यविक्री दुकांनाचे नुतनीकरण बंद करण्यात आले होते. मात्र या आदेशाबाबत नव्याने स्पष्टीकरण आल्याने आता महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील दुकानाचे परवान्याच्या नुतनीकरणास प्रारंभ करण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात बुधवार, दि. ६ पासून मद्यविक्री व्यावसायिकांच्या रांगा लागल्या आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर जिल्ह्यात काल बुधवारी ४९ परमिट रुम, ११ वॉईन शॉप, ९ बिअर शॉप व एक देशी दारु दुकानाच्या परवाना नुतनीकरणास परवानगी देण्यात आली असून यामध्ये नगर शहरातील १५ परमिट रुम, ५ वॉईन शॉप व दोन बिअर शॉपींचा समावेश आहे.

परवाना नुतनीकरणास प्रारंभ झाला असून व्यावसायिकांची एकच झुुंबड उडाली आहे. वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामगारवरील दारु विक्रीचे दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाची कडक अंबलबजावणी करण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने या आदेशाबाबत पुन्हा स्पष्टीकरण दिल्याने मद्यविक्री व्यवसायिकांचा जीव भांडयात पडला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.