नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने मॅरेथॉनने गणरायास निरोप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी मॅरेथॉनने गणरायास निरोप देण्यात आला. गणपत्ती बाप्पा मोरयाच्या गजरात मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यासाठी व्यायाम, स्वच्छता, प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यात आला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मंगळवारी सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन व श्री विशाल गणपतीच्या आरतीने या मॅरेथॉनचा प्रारंभ करण्यात आला.आरोग्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.गणपती विसर्जन मार्गावरुन नगर रायझिंग ग्रुपचे सदस्य धावले.

 यामध्ये संदीप जोशी, मनिष सोमानी, अमृत पितळे, श्याम तारडे, अंबादास हुलगे, विलास भोजणे, गौतम जायभाय, योगेश खरपुडे, योगेश बजाज, सोनाली गोडबोले, योगेश गोडबोले, अ‍ॅड.अशोक बारगजे, अ‍ॅड.अशोक धायगुडे, बाळासाहेब गवळी, रवी पठारे, प्रसाद तनपुरे, डॉ.आकाश होनमाने, अमोल सायंबर, मारुती शेळके, दादा बोडखे सहभागी झाले होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.