२२ वर्षीय तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्‍यातील शिरेगाव येथील 22 वर्षीय तरुणाची पिंप्री अवघड येथील उड्डाणपुलानजीक उसाच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाची हत्या की आत्महत्या याबाबत परिसरात चर्चा होत आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शिवाजी हरिभाऊ जाधव (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, जाधव हा पुणे येथील कंपनीत कामाला होता. त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी घरी फोन करून मी राहुरी येथील उड्डाणपुलाखाली आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यावेळी नातेवाईकांनी दोन-तीन दिवसांपासून परिसरात शोध घेतला. मात्र, जाधव हा मिळून आला नाही.

त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी पिंप्री अवघड उड्डाणपुलाखालील सुधाकर कल्हापुरे यांच्या उसाच्या शेतात मिळून आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. डी. गायकवाड, पोलीस हवालदार उत्तरेश्वर मोराळे, भाऊसाहेब आव्हाड, गोकुळ परदेशी यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी तरुणाने आत्महत्या का केली ? राहुरी परिसरच का निवडला ? त्याचे कोणाशी काही वाद झाले होते का ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.