आता शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा विषय चर्चेचा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शाळांच्या दुरवस्थेपाठोपाठ आता शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा विषयदेखील ग्रामीण भागात चर्चेचा झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. रस्त्याचे काम होऊन काही महिने उलटत नाही तेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत आहेत. यावर प्रशासनाला मोठा अपघात झाल्यानंतर किंवा काही जणांचे जीव गेल्यावर जाग येणार का? निकृष्ट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणार कोण? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

निंबोडी येथे झेडपीच्या शाळेचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रस्त्याबाबत ग्रामीण भागात चर्चा होत आहे. रस्त्याबाबतही शासनाने उपाययोजना राबवायला हव्या. ज्या ठेकेदारांना रस्त्याचे, शाळेच्या खोल्याचे, सार्वजनिक ठिकाणचे काम दिले जाते हे काम दर्जेदार करून घेणे ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. परंतु, अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी शाळा दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीसाठी आणि विविध कामांसाठी येतो. परंतु, या निधीतून कामे प्रत्यक्षात दर्जदार होतात की निकृष्ट होतात हे तपासणे अधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुरू असलेल्या कामावर लक्ष नसल्याने ग्रामीण भागातील कामे खालील अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

अनेकवेळा दुरुस्ती होऊनदेखील त्याच कामाची पुन्हा दुरवस्था होते; याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडत आहे. नेवासा तालुक्‍यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अनेक रस्ते धोकादायक बनले आहेत. 

या रस्त्यावरून प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करत जिवाशी झुंज देत प्रवास करावा लागत आहे. मध्यंतरी खड्डे बुजवण्यात आले होते, तर आता त्याच रस्त्यांवर पुन्हा खड्डे झालेले आहेत. या दुरुस्त केलेल्या सर्वच कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.