श्रीगोंदा तालुक्यातील 'त्या' साहेबांना वाढदिवसाची 'अनोखी' भेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील स्वयंघोषित 'साहेबां'चा परजिल्ह्यातील आमदाराच्या उपस्थितीत वाढदिवस पार पडला. मात्र त्याचदिवशी 'त्या' साहेबांचे कट्टर समर्थक पदाधिकारी असणाऱ्या एका सहकारी संस्थेतून 'साहेबां'चा फोटो भरसभेत काढण्यात आला. 

'साहेबां'ना वाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे वाढदिवस 'कडू' झाला. तालुक्याच्या राजकारणाचा स्वतःला 'किंगमेकर' म्हणवून घेणाऱ्या 'त्या' साहेबांचा वाढदिवस नुकताच एका पर जिल्ह्यातील आमदाराच्या उपस्थितीत पार पडला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

'त्या' साहेबांच्या वाढदिवशी त्यांचेच समर्थक पदाधिकारी असणाऱ्या खादी ग्रामोद्योग सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 'त्या' साहेबांच्या समर्थकाच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यालयात पार पडली. या वार्षिक सभेच्या सुरुवातीलाच हिरडगाव येथील दत्तात्रय दरेकर यांनी, संस्थेच्या वाटचालीत कोणतेही योगदान नसताना व संस्थेशी 'त्या' साहेबांचा काहीच संबंध नसताना 'त्यांचा' फोटो संस्थेच्या कार्यालयात का लावला ? 

असा सवाल उपस्थित करीत 'त्या' साहेबांचा संस्थेच्या कार्यलयातील फोटो त्वरित काढण्याची मागणी केली. दत्तात्रय दरेकर यांच्या फोटो काढण्याच्या सूचनेला ज्ञानदेव शिरवाळे यांनी अनुमोदन दिले. 'त्या' साहेबांचा संस्थेच्या कार्यालयातील फोटो काढल्याशिवाय वार्षिक सभा सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका बहुतांशी उपस्थितांनी घेतली. 

उपस्थित आपल्या मागणीवर ठाम असल्याने साहेबांचे समर्थक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी गोची झाली. उपस्थितांच्या तीव्र भावना लक्षात घेत अखेर संस्थेच्या सचिवांनी 'तो' फोटो काढला. त्यानंतर खादी ग्रामोद्योग संघाच्या वार्षिक सभेला सुरुवात झाली.

यामुळे वाढदिवशी 'त्या' साहेबांना मिळालेल्या या भेटीमुळे साहेबांचा वाढदिवस 'कडू'च ठरला. खादी ग्रामोद्योग संघाच्या वार्षिक सभेत घडलेल्या या प्रकाराची श्रीगोंदयात चांगलीच चर्चा रंगली होती. 

'साहेबां'चा वाढदिवशी शिव्यांच्या लाखोलीने 'सत्कार'! 
साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यांनातर परजिल्ह्यातील आमदार आणि स्वयंघोषित 'साहेब' निवडक कार्यकर्त्यांसह एका ढाब्यावर जेवणासाठी गेले. जेवणासाठी ढाब्यावर पोहचले असता तेथे मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या साहेबांच्याच जुन्या समर्थकांनी 'आमचं तर वाटोळं केलंच, आता आणखी किती जणांना भूमिहीन करणार ?' असा सवाल करीत साहेबांना सर्वांसमोर शिव्यांची लाखोली वाहून चांगलाच 'सत्कार' केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.