साई शताब्दीउत्सव काळात शिर्डीत येणाऱ्या दिव्यांगांना रिक्षाचालक देणार मोफत सुविधा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डी परिसरातील राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षणच्या संकल्पनेतून सात रिक्षा चालकांनी शताब्दी वर्षासाठी शिर्डीत येणाऱ्या दिव्यागांना मोफत रिक्षा सेवा योजनेचा शुभारंभ राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षणचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दरम्यान, छत्रपती व्यापारी संकुलाजवळ सोमवारी सकाळी रिक्षा चालक तसेच दिव्यांग यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षणचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जाधव, उपाध्यक्ष भाऊसाहेब दिघोळे, पारसनाथ कटारे, रामनाथ नागरगोजे, राघवेंद्र मिरजकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांगासाठी मोफत रिक्षा सेवा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षणच्या माध्यमातून समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय देण्याचे काम करत देशभर करत आहोत. पुढील महिण्यात साईसमाधी शताब्दी सोहळा सुरू होत असल्याने साईबाबांच्या प्रतीऋण फेडण्यासाठी ही छोटीशी सेवा बाबांच्या चरणी समर्पीत करत आहोत. 

पहिल्या टप्प्यात सात रिक्षा सुरू केल्या आहेत. ही संकल्पना जिल्हाभर राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग संजय येवले म्हणाले की, या माध्यमातून आम्हाला मोफत सेवा मिळ्याल्याबद्दल आभार व्यक्‍त करून आमच्याकडून जे काही योगदान लागेल ते देणार असल्याचे सांगितले.
संजय डांगे, अरूण कांबळे, रिक्षाचालक अंकुश गवळी, सिकंदर पठाण, ज्ञानेश्‍वर तांबे, बाळासाहेब सरोदे, लक्ष्मण झाडे, कैलास निर्मळ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.