राहाता तालुक्‍यात बिबट्यांच्या झुंजीत नर जातीचा बिबट्या ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्‍यातील वाकडी येथील लांडेवाडी भागात बिबट्यांच्या झुंजीत नर जातीचा एक बिबट्या ठार झाला. मंगळवारी सकाळी बिबट्यांची झुंज झाली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संतोष लांडे हा तरुण सकाळी 10 च्या सुमारास शेतात गेला असता. त्याला गुरकण्याचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने बघितले असता भाऊसाहेब लांडेयांच्या गट क्रं 353 मध्ये उसाच्या फडात बिबट्या बसलेला दिसला. त्याने घाबरलेल्या अवस्थेतच आजुबाजूच्या शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली.

शेतकऱ्यांनी धाव घेतली असता बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती वनविभागालाही देण्यात आली. वनरक्षक सुरवसे हे घटनास्थळी दाखल झाले. आजुबाजुला बघितले असता गोकुळ लांडे यांच्या गट नं 372 मध्ये सोयाबीनची नासाडी झालेली दिसली. 

यावरुन बिबट्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केला. कोपरगाव येथेवनपाल गावडे यांना भ्रमणध्वनीवरुन तात्काळ माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी यांनाही बोलवण्यात आले. पण वैद्यकीय आधिकारी येण्याच्या आतच बिबट्याचा मृत्यू झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.