कोपर्डी प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याने उच्च न्यालयात काही साक्षी घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यात न्यायालयाला चित्रफिती सादर करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची साक्ष घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानुसार न्यायालयात रवींद्र चव्हाण यांची सरतपासणी झाली. मात्र, सायंकाळ अखेर चव्हाण यांची उलटतपासणी पूर्ण होऊ शकली नाही. याप्रकरणाची सुनावणी आता 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायालयात कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायालयात काही चित्रफिती दाखविण्यात आल्या. त्यात विशेषत: कोपर्डी घटनेनंतर निघालेल्या मोर्चांच्या संदर्भात ऍड. निकम यांनी केलेले वक्‍तव्य दाखविण्यात आले.

त्यावरून ऍड. निकम यांनी रवींद्र चव्हाण यांना काही प्रश्‍न विचारले आज या साक्षीदाराची उलटतपासणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. आरोपीच्या वतीने ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.