ग्रामपंचायतींनी विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा : आशुतोष काळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामपंचायतींनी प्रथम पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता व रस्ते या मुलभूत सुविधांना प्राधान्य देणारा गावाच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम करावे. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा सज्जड इशाराच त्यांनी यावेळी दिला.

काळे म्हणाले, आरोग्य विभागाने जोपयंर्त नवीन कर्मचारी आरोग्य विभागात दाखल होत नाही, तोपयंर्त आहे त्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने आंचलगाव व परिसरातील स्वाईन फ्ल्यू व इतर साथींच्या आजारांच्या बाबतीत काळजी घ्यावी.

बांधकाम विभागाने दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आता पडायला लागल्या आहेत. यामध्ये वारी, भोजडे, काकडी, कोळगाव थडी, मंजूर, करंजी, सुरेगाव, कोळपेवाडी आदी गावातील धोकादायक असलेल्या पाण्याच्या टाक्याचा आढावा घेवून त्या संदर्भात तातडीने निर्लेखनाचे प्रस्ताव तयार करून त्या टाक्या पाडून घ्याव्यात.

यामध्ये मुर्शतपूर, हिंगणवेढे, डाऊच, बोलकी, बहादराबाद, रांजणगाव देशमुख, भोजडे, तीळवणी, रेलवाडी, कोकमठाण आदी गावातील धोकादायक शाळा खोल्यांचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना केल्या. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.