अभय देणा-या 'त्या' पोलीस कर्मचारी व दोषींवर कारवाई करावी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्राणघातक रासायनिक पदार्थांचा वापर करुन मावा विकणा-या टोळीला अभय देणा-या त्या पोलीस कर्मचा-यांचा व क्रमांक झाकलेल्या गाडीचा शोध घेवून या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

रविवारी क्रमांक झाकलेल्या गाडीतून येवून काही पोलीस कर्मचा-यांनी घातक रासायनिक पदार्थापासून मावा बनविणा-या एका व्यक्तीच्या काराखान्यावर धाड टाकली. तेथे ते सुमारे दोन तास होते. परंत कुठलीही कारवाई न करता हात हालवत परत गेल्याने नागरिकांतून आस्चर्य व्यक्त होत आहे.

काही नागरीकांनी या गाडीचे मोबाईल मध्ये फोटो व शुटींग करुन घेतले. हे पथक नेमके कोणाचे याबाबतही शहरात चर्चा सुरु झाली. अन्न व औषध प्रशासन, नगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा की अन्य असे तर्क - वितर्क लढवण्यात येत होते. स्थानिक पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी या कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही असे स्प्ष्ट केले. तर अन्न व औषध प्रशासनाच्या वरीष्ठ अधिका-यांनीही आम्ही शेवगावला कुठलीही कारवाई केली नाहीय असे स्पष्ट केले. 

काही नागरिकांनी इंटरनेटवर प्रादेशिक परिवहन खात्याच्या संकेत स्थळावर गाडीचा झाकलेला अर्धा क्रमांक टाकून गाडी कोणाशी संबंधीत आहे. याचा शोध घेतला असता उर्वरीत क्रमांक हा पोलीस खात्यात असणा-या वाहनाशी जुळल्याचे सांगितले. 

तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आमचे पथक शेवगावला आले होते मात्र त्या काराखान्यावर त्यांनी छापा टाकला नाही अशी पुस्ती त्यांनी जोडली. त्यामुळे हा छापा नेमका घातला कोणी व मावा विक्रेत्यांशी तडजोड केली कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जनतेच्या जिवाशी खेळणा-या या मावा - गुटख्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस याची खुलेआमपणे विक्री होत असतांनाही त्याकडे सोयीस्कर रित्या आर्थिक तडजोड करत असल्याने दाद मागावी तरी कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. 

छापा टाकूनही काहीच कारवाई होत नाही. संबंधीत अधिकारी - कर्मचारी स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतात. त्यामुळे हे व्यवासायिक अत्यंत निर्दास झाले आहेत. प्राण घातक रसायने, गांजा, झंडुबाम, नशेच्या गोळ्या आदी पदार्थ या माव्यात मिसळले जातात. 

त्याचा साठाही या व्यावसायिकांकडे मोठया प्रमाणात आहे. याबरोबरच हिरा, गोवा, माणिकचंद या गुटख्याच्या पुडया व चरस , हेराँईन या सारखे आमली पदार्थही सर्रासपणे विकले जात असल्याची माहिती आहे. 

मात्र आर्थिक देवघेविच्या खेळामुळे सामान्य नागरिक हतबल झाले असून तरुण पिढी बरबाद होतांना पहात आहे. वरिष्ठ अधिका-यांनी शेवगावात घडलेल्या या प्रकाराची स्वतंत्र यंत्रनेमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.