स्‍वच्‍छ, सुंदर भारतासाठी प्रत्‍येकाचे योगदान महत्‍वाचे - अंजली गायकवाड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्‍वच्‍छ, सुंदर भारतासाठी प्रत्‍येक नागरिकाचे योगदान महत्‍वाचे ठरणार असल्‍याचे प्रतिपादन श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील जेष्‍ठ शिक्षिका अंजली गायकवाड यांनी आज येथे केले. स्‍वच्‍छ, सुंदर भारतासोबतच तंदुरूस्‍त भारतासाठी प्रत्‍येकाने आपल्‍या आरोग्‍याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर व उप माहिती कार्यालय शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने संवादपर्व कार्यक्रमात श्रीमती गायकवाड बोलत होत्‍या. यावेळी प्र. माहिती अधिकारी गणेश फुंदे, कोपरगाव ग्रामिण रुग्‍णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आनंद पाटील, जेष्‍ठ शिक्षक दिलीप तुपसैंदर,निलेश बडदाते, अतुल कोताडे श्रीमती शोभा पुरी, संजिवनी डरांगे, आनंद टिळेकर आदी उपस्थित होते.

माहिती कार्यालयाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेला संवादपर्व उपक्रम कौतुकास्‍पद असून या माध्‍यमातून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार होणार असल्‍याचे सांगून श्रीमती गायकवाड म्‍हणाल्‍या, आपण गतीने प्रगती करत आहोत, मात्र आरोग्‍याच्‍या बाबतीतही आपल्‍याला जागरूक रहावे लागणार आहे, तंदुरुस्‍त भारत निर्माण करण्‍यासाठी प्रत्‍येक विद्यार्थी, युवकाने आपल्‍या आरोग्‍याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

आरोग्‍य विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करुन श्री. पाटील म्हणाले, आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आरोग्‍यविषयक जागृती केली जाते. आरोग्‍यासाठी तातडीची मदत लागत असेल तर 108 ही टोलफ्री सुविधा आहे, या सुविधेबाबत इतरांनाही माहिती द्यावी, असे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्‍यांना लोकराज्य अंकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी रविंद्र अमृतकर यांनी संवादपर्व उपक्रमाचे कौतुक करुन आरोग्‍याच्‍या काही महत्‍वपुर्ण टिप्‍स सांगितल्‍या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल अमृतकर यांनी, तर आभार दिलीप तुपसैंदर यांनी मानले. यावेळी सर्वशिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी स्‍चच्‍छतादूत सुशांत घोडके, किरण भोसले, जालिंदर कराळे, प्रविण मुठे, अतुल सोनवणे, नागेश निकम यांनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.