जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला श्रीरामापुरातील रस्त्याच्या कामाचा अहवाल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत नगरसेवक राजेंद्र पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाचे निवेदन दिले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाचा अहवाल मुख्याधिकारी यांना मागितला आहे. तसे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पालिकेतील सत्तांतरानंतर मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील गैरकारभाराची अनेक मासिक सभांमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये शहरातील सेंट्रल गोडाऊन ते मराठा बोर्डिंग, मराठा बोर्डिंग ते दमानी हॉस्पिटल, कुकरेजा बिलिंडग ते बाजारतळ, गिरमे चौक ते गायकवाड वस्ती, गायकवाड वस्ती ते टिळकनगर रोड, बेलापूर रोड ते सरस्वती कॉलनी, सरस्वती कॉलनी ते अडसुरे बंगला, शिवाजी चौक ते मौलाना आझाद चौक या रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाले.

भुयारी गटार योजनेतसुध्दा सुमारे दोन कोटी रुपयांचे कुठलेही काम न करता अदा करण्यात आले. भुयारी गटारीच्या कामात साऊथ झोनमध्ये पालिकेकडे जागा उपलब्ध नसतानादेखील त्याठिकाणी बांधकाम केल्याचे दाखवून आगाऊ मोठ्या रकमा अदा केल्या असल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या रस्त्याच्या कामातील गैरकारभाराबाबत चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत पवार यांच्यासह नगराध्यक्षा आदिक यांना रस्त्याच्या गैर कारभाराबाबत मुख्याधिकाऱ्यां कडे अहवाल मागितला आहे. मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील गैरकारभाराची हळूहळू चौकशी सुरू होणार असल्याचे पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.