अकोल्यात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील विश्रामगड (पट्टाकिल्ला) पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. काल सोमवारी सकाळी ८.३०च्या सुमारास त्याचा मृतदेह दरीतून काढण्यात आला. मरण पावलेल्या या तरुणाचे अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (वय २६) असे नाव असून तो नाशिक रोड येथील आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मयत अभिषेकच्या वडिलांनी अकोले पोलिसांना दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, त्यांचा मुलगा अभिषेक उपाध्याय हा ३ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान चित्रपट पहावयास जातो, असे सांगून घरातून गेला, तो परत आलाच नाही.

रात्री ११.३० च्या सुमारास त्याच्या मित्रांचा फोन आला की, ते पट्टाकिल्ला पहावयास गेले असता तो कोकणवाडी येथील पवनचक्की क्रमांक ५४ जवळ असलेल्या डोंगराच्या दरीत पडून मरण पावल्याचे समजले. त्यावरून ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वा. त्याचा मृतदेह दरीत आढळून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

यावरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्युची रजि.नं.६७/१७ भादवि कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील पट्टाकिल्ल्याच्या परिसरात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.