शिर्डी विमानतळावरून महिनाअखेर 'टेकऑफ'.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी विमानतळावरून दररोज रात्री सहा उड्डाण चालविल्या जाणार आहेत. महिनाअखेर मुंबई, दिल्ली व हैदराबाद ही शिर्डीशी विमानाद्वारे जोडली जाणार आहेत. या विमानसेवेचे दर अद्याप निश्चित झालेले नसून त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अंतिम मंजुरीनंतर सप्टेंबर अखेरीस विमान उड्डाणं सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) या विमानतळाची स्थापना करणाऱ्या नोडल एजन्सीमधील सूत्रांनी सांगितले की, अलायन्स एअर (एअर इंडियाची एक उपकंपनी) मुंबईसाठी चार उड्डाणे आणि एक दिल्लीला चालविणार आहे.

तर खासगी विमानसेवा ट्रूजेट शिर्डी आणि हैदराबाद दरम्यान उडेल. साईंच्या दर्शनासाठी अनेक भक्त देशाच्या विविध भागातून शिर्डीला येत असतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरण्याची चिन्हं आहेत. 

राज्य विमान वाहतूक सचिव वलसा नायर सिंग यांनी पुष्टी केली की, १५ सप्टेंबरपर्यंत विमानतळाच्या काम काजाच्या अंमलबजावणीची अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत आणि त्यानंतर विमान उड्डाण सुरू होतील.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.