श्रीगोंद्यात घरफोडी : तीन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मंडळांचे बाप्पासमोर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे गावात उशिरापर्यंत महिला पुरुषांची गर्दी असते. मात्र तरीही तालुक्यातील काष्टी येथील बाजारपेठेत दोन ठिकाणी चोरांनी सुमारे तीन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.या घटनेमुळे व्यापारी वर्गात एक खळबळ उडाली आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर असे की,भैरवनाथ चौकातील मारुती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर रसिकलाल मोहनलाल गांधी (वय ६५) यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद करुन घरातील एकूण आठ सदस्यासह झोपले.

पहाटे तीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी गांधी यांच्या तीन मजली इमारतीच्या छतावरुन आत प्रवेश केला. तिसऱ्या मजल्यावर विजय रसिकलाल गांधी हे कुटुंबासह झोपले होते. चोरांनी त्यांच्या बेडरुमचा दरवाजा बाहेरून बंद केला व खाली आले व ते राजेंद्र रसिकलाल गांधी कुटुंबासह व हॉलमध्ये रसिकलाल गांधी हे झोपले होते.

चोरांनी कपाटातील कपड्यांची उचकपाचक करत घरातील महिलांचे आठ ते दहा तोळे सोने व रोख साठ हजार रुपये, किरकोळ वस्तू घेऊन पहिल्या मजल्यावर येऊन दुकानाचे दार उघडून निघून गेले.नंतर मारुती मंदिराकडे राहणारे किराणा व्यापारी संतोष देशमाने यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरातील ऐवज नेला आहे.

परंतु देशमाने हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचा किती ऐवज गेला हे समजले नाही.चोरांनी जाताना दुकानाच्या शटरचा आवाज आल्याने गांधी कुटुंबीय जागे झाले. नंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले.याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार,पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.