सरकारने आता शेतकऱ्यांना अर्जमाफी द्यावी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जमाफीची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांत छोटे आणि मोठे शेतकरी अशी फूटपडली. त्यानंतर कर्जमुक्ती देण्याऐवजी तत्वत: कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेण्याचे नाटक सुरू केलेलेआहे. सरकारकडे सर्व माहिती आधीच उपलब्ध आहे, तरीही अर्ज भरून घेऊन नोटबंदीनंतर पुन्हा एकदा शेतकरी रांगेत उभा करण्याचे पातक सरकारने केले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांना अर्जमाफी द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने एक दिवस लाक्षणिक उपोषण करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. यानिमित्त लाल टाकी रोडवरील हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारकामध्ये आयोजितकार्यक्रमात अध्यक्ष घनवट बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष (दक्षिण नगर) सचिन चोभे, जिल्हाध्यक्ष  (उत्तर नगर) बापुराव आढाव, स्वतंत्र भारतपक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती. इंदूताई ओहोळ, जिल्हाउपाध्यक्ष संजय तोरडमल, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष महादेव खामकर, तालुकाध्यक्ष संदीप गेरंगे, त्रिंबक भदगले, रमेश रेपाळे, महादेव गवळी, संतोष वाघ, लक्ष्मण अवसरे, अशोक जगताप, शरदजोशी, जालिंदर कराड, डॉ. संजय कुलकर्णी, नामदेवराव धनवटे, कारभारी कणसे, आंबादास राऊत,सुधाकर देशमुख, नारायण पोटभरे, अनिल भुजबळ, रामदास वांगणे, आंबादास चव्हाण आदीउपस्थित होते.

घनवट म्हणाले की, शेतकर्यांच्या कर्जमुक्तीबाबत एक प्रस्ताव शेतकरी संघटनेने दि. १ ऑगस्ट२०१७ रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला सादर केला होता. या प्रस्तावात शेतकर्यांना संपुर्णकर्जमुक्त करणे, शेतीमाल आयात निर्यातीवरिल सर्व नियंत्रण काढुन टाकणे, शेती विरोधी कायदे रद्दकरणे, शेतीसाठी लागणारी विज, पाणी, रस्ते याबाबत संरचना निर्माण करणे, ग्रामिण भागात प्रक्रिया उद्योग, गोदामे, शितगृह इथेनॉल निर्मिती इत्यादी शेती संलग्न व्यवसायांना चालना देणे व संपुर्ण कर्ज एकदम बेबाक करणे शक्य नसले तर १० वर्ष शेतीकर्ज वसुलीस स्थगिती देणे असेउपाय सुचविले होते. शासानाने वरिल पैकी शेतकरी धार्जिणे निर्णय न घेता शेतकर्यांच्या लुटिचेच धोरण चालू ठेवले आहे. शासनाच्या या शेतकरी विरोधी कृतिचा निषेध करण्यासाठी दि. ३.सप्टेबर रोजी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केले. पुढील काळात याच मागण्यांसाठी संघटना जोरदार लढा उभारणार.

शेतकर्यांना दिड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करुन राज्य सरकारने शेतकर्यांचे आंदोलन मोडुन काढले. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरात काहीच पडले नाही. शासनाकडे पुरशी यंत्रणा नसताना, आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले आहे. कामधंदा सोडुन, शेकडो रुपये खर्च कारावे लागत आहेत. शेतकरी रांगेत उभे राहुन व हेलपाटे मारुन त्रस्त झाले आहेत. शेतकर्यांची सर्व माहिती शासनाकडे आॅनलाइन उपलब्ध असताना शेतकर्यांना हा त्रास का दिला जातोय ? कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया रद्द करावी अशी शेतकरी संघटनची मागणी असल्याचेही स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेळके यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.