खासदार,आमदारांसह राजकीय नेत्यांचे जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष.राहुरीला वाली कोण ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील अनंत प्रश्‍न निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्था, सामाजिक प्रश्‍न, पावसामुळे झालेले नुकसान, शेतकर्‍यांच्या अडचणी अशा विविध प्रश्‍नांना तोंड देण्याचे काम सर्वसामान्यांना करावे लागत आहे. दरम्यान अनेक प्रश्‍न उद्भभवलेले असताना मात्र लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमदारांसह इतर राजकीय नेते दुर्लक्ष करीत असल्याने राहुरी भागाला वाली कोण? चर्चा होत असताना ‘एक ना कामाचा व सारा गाव मामाचा‘ असे बोलले जात आहे. 

राज्यात व केंद्रात सत्ता असलेले खासदार व आमदार राहुरी मतदार संघाला लाभले. अनेक दिवसानंतर केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे खासदार व आमदार लाभल्याने राहुरी मतदार संघाचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

खा. गांधी यांचे राहुरीकडे सोयीस्कर दुर्लक्ष 
दरम्यान खा. दिलीप गांधी यांचे बालपन राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावात गेले असून त्यांचे शिक्षणही तालुक्यात झाले आहे. यामुळे त्यांच्याकडून राहुरीकरांना झुकते माफ राहिल अशी अपेक्षा लागलेली होती. मात्र खा. गांधी यांनी मोदी लाटेत मोठे मताधिक्य प्राप्त केल्यानंतर राहुरीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
बोटावर मोजण्याइतक्यावेळी खा. गांधी यांचे राहुरीत दर्शन झाले आहे.

आ.कर्डिले बाबत जनतेच्या अपेक्षा फोल
तर आ. शिवाजी कर्डिले यांनीही खमक्या आमदार म्हणून राहुरी मतदार संघात गत पंचवार्षिक निवडणुकीत विविध विकास कामांतून आपल्या विकास कामांची चुणूक दाखवून दिली. सत्तेत नसतानाही त्यांनी बर्‍यापैकी विकास कामे करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनाही राहुरी भागात अधिक प्रतिसाद मिळाला. मात्र त्यांच्याकडे असणार्‍या मोठ्या अपेक्षा फोल ठरू लागलेल्या आहेत.

राहुरी तालुक्याला वाली कोण ?
 बस आगाराचा प्रश्‍न, औद्योगिक वसाहतीचा प्रश्‍न, निळवंडे कालव्याचा प्रश्‍न, आदिवासी समाजाचे प्रश्‍न, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न असे अनेक प्रश्‍न गत 10 वर्षांपासून जैसे थे आहेत. तर याबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह विरोधी असलेले राजकीय नेतेही आपले अस्तित्व राखण्यात गर्क आहेत. यामुळे राहुरी तालुक्याला वाली कोण ? असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.

जनतेच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञच...
नुकतेच शेतकरी आंदोलनावेळी शेतकर्‍यांच्य अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार असो किंवा आमदार या दोघांनीही शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थोडासाही पुढाकार घेतला नाही. तर सद्यस्थितीत राहुरी भागात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, खून, दरोडे, महिलांची लुटमार, विनयभंग आदी प्रकार सर्रासपणे घडत आहेत. मात्र याबाबत लोकप्रतिनिधी याबाबत अनभिज्ञच आहे.

नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींना माहिती नाहीच ? 
नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. मात्र शेतकर्‍यांच्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींना माहिती नसल्याचे दिसत नाही. राहुरी भागातील दुसरे आ. भाऊसाहेब कांबळे यांनी शासकीय अधिकार्‍यांसमवेत शेती नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र राहुरी विधानसभा मतदार संघात कोणत्याही राजकीय नेत्याने पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

राहुरी तालुक्याला कोणीच वाली नाही ? 
तर शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज सादर करताना अनंत अडचणी येत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र त्याकडेही आमदार व खासदार यांनी ढुंकूनही पाहिले नाही. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारोदार फिरणारे राजकीय नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे राहुरी तालुक्याला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.