शिर्डी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या आठवड्यात शिर्डीमध्ये एक हजार रुमच्या परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सोमनाथ राजेंद्र गायकवाड (वय २५, रा. साकुरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिर्डीत रिक्षा चालविण्याचे काम करत होता. त्याच्या खुनप्रकरणी प्रवीण नानासाहेब वाघमारे (वय २१, रा. पिंपळस, ता. राहाता), शशिकांत राजेंद्र साळुंके (वय २०, रा. वाकडी), विनायक संजय गवळी (वय १९, रा. संतनगर, शिर्डी) यांना अटक करण्यात आली आहे.

तिघांनीही खुनाची कबुली दिली आहे. वाघमारे हा संस्थानमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करतो तर इतर दोघे खासगी हॉटेलमध्ये रुम भरण्याचे काम करतात. प्रवीण वाघमारे याचे मयत सोमनाथ याच्याशी वाद झाले होते. यावरून तिघांनी त्याला मारहाण करून त्याचा खुन केला व त्याचा मोबाईल घेऊन पळून गेले. 

सोमनाथच्या डोक्यावर, चेहऱ्यावर ठिकठिकाणी टणक वस्तुने मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी तीन दिवस प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणला. यात पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक संदीप दहिफळे, संदीप कहाळे, जगदीश मूलगीर यांनी भाग घेतला. सुमारे १० पोलीस कर्मचारी तीन दिवसांपासून तपास करत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.