जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा 'अगस्ती' निश्चित जास्त भाव देईल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अगस्ती सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा निश्चित जास्त भाव देईल, यात शंका नाही. कारखान्याने गेल्या २३ वर्षात एस.एम.पी. व एफ.आर.पी.पेक्षा उसाला जास्त भाव दिला आहे. म्हणून २७ कोटी रुपायांचा कर भरण्यासाठी सरकारने फर्मावले असून अगस्ती नेहमीच ऊस उत्पादकांचा विचार करूनच निर्णय घेतो. त्यांचे हितच आमच्यासाठी महत्वाचे असल्याने कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून पिचड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे व्हा.चेअरमन सिताराम गायकर, जि.प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले, अेटीएस अध्यक्ष जे.डी.आंबरे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, बाजार समितीचे सभापती परबतराव नाईर्कवाडी, शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा संचालक मच्छिंद्र धुमाळ, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद देशमुख, कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक प्रकाश मालुंजकर, पाटपाण्याचे अभ्यासक मिनानाथ पांडे, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रविण मालुंजकर आदी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, पूर्वीची कारखान्याची परिस्थिती अन् आताची यात अमुलाग्र बदल झाला असून कारखाना यशस्वी झाला. यामागे शेतकरी कामगार हे आहेत. आता लक्ष कारखाना स्वयंपूर्ण करण्याकडे आहे. तालुक्यात भंडारदरा, निळवंडे, आढळा, पिंपळगाव खांड या धरणांसह १३ मध्यम लघु प्रकल्प, १४ केटी वेअर, ११४ पाझर तलाव, २४० साठवण बंधारे या सर्व उपलब्ध पाणी साठ्याचा उपयोग तालुक्यात केला, तर १७ ते १८ हजार हेक्टर ऊस निर्माण होऊ शकतो.

कारखान्याला ऑडीट वर्ग 'अ' मिळाला आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षात ११ लाख रुपये नफा मिळाला, हे चांगले पाऊल पडले आहे. आतापर्यंत २३०० रुपये उसाला भाव दिला असून हा अंतिम भाव नाही. तर जिल्ह्यात इतर कारखाने जो भाव देतील, त्यापेक्षा एक रुपया जादा भाव देवू. असेही पिचड म्हणाले..
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.