संगमनेर मधून अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरी सोडतो' असे सांगून दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी येथे नुकतीच घडली आहे. मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी रमेश धोंडिबा डोंगरे (रा.आभाळवाडी) याच्या विरुद्ध अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऐठेवाडी याठिकाणी या अल्पवयीन मुली आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्या दोघीही आभाळवाडी याठिकाणी असणाऱ्या आत्याच्या मामाच्या घरी आल्या होत्या. पुन्हा त्या गुरुवार दि.१७ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऐठेवाडी येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.

 त्याच दरम्यान आभाळवाडी येथील रमेश डोंगरे हा त्या मुलींना म्हणाला की, तुम्हाला घरी सोडतो, असे सांगून त्या दोघींनाही घरुन घेवून गेला. परंतु अद्यापही तो मुलींना घरी घेवून आला नाही. म्हणून मुलींच्या आईने थेट घारगाव पोलिस स्टेशन गाठले आणि रमेश डोंगरे याच्या विरुद्ध फिर्याद दिली. 

त्यामुळे घारगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.