शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पदवीधर नवविवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील आंबादास मच्छिंद्र ढाकणे तसेच त्याचा भाऊ वहिनी या तिघांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे.दोन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या पदवीधर नवविवाहितेवर ही वेळ आल्याने शेवगाव तालुक्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

लग्न झाल्यापासून नवविवाहितेला सासरची मंडळी टेम्पो घेण्यासाठी दोन लाख रुपये माहेराहून घेऊन येण्यासाठी या पदवीधर नवविवाहितेचा होता. वेळोवेळी शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवून या नवविवाहितेला शारीरिक व मानसिक छळ सासरच्या मंडळीकडून चालू होता.

याबाबत माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी येथील दत्तात्रय फुंदे यांची मुलगी मनीषा हिचा विवाह दोन महिन्यापूर्वी शेवगाव तालुक्यातील हसनापुर येथील अंबादास मच्छिंद्र ढाकणे यांचा विवाह दोन महिन्यापूर्वी पार पाडला होता . 

लग्नानंतर या नवे त्याला सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम चालू होते. शेवटी या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मनीषा अंबादास ढाकणे (वय २१) हिने दि.२ सप्टेंबर रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

याबाबत मयत महिलेचा भाऊ गणेश दत्तात्रय फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी मयत महिलेचा पती अंबादास मच्छिंद्र ढाकणे, भाऊ जगदीश मच्छिंद्र ढाकणे, वाहिनी राणी जगदीश ढाकणे अशा तीन जणाविरुद्ध भा.द.वी.क.३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास हाटटेकर हे अधिक तपास करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.