मांडवे रस्त्यावर विध्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील एका अल्पवयीन मुलीला गाडीवर बसवून नेत तिच्यावर आत्याचार करण्याची घटना ताजी असतानाच मांडवे येथील चौदा वर्षाच्या शालेय विद्याथ्र्याला जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत समजलेली माहिती अशी की, मांडवे येथील एक शालेय विद्यार्थी शनिवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील शाळेतून घरी येत होता. या वेळी पाठीमागून मोटारसायकलर आलेल्या दोघा जणांनी त्यास जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु या वेळी त्याने चालत्या मोटारसायकल वरून उडी मारल्याने पळवून नेणाऱ्यांचा प्रयत्न फसला. 

मोटारसायकलवरून उडी मारल्याने हा विद्यार्थी जखमी झाला. या वेळी मोटारसायकल तेथून पसार झाले. या वेळी मुलाचे नातेवाईक व ग्रामस्थांकडून मोटारसायकलस्वारांचा बराच वेळ शोध घेतला जात होता. जखमी विद्याथ्र्याला तिसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकारामुळे हा विद्यार्थी प्रचंड घाबरलेला होता. या वेळी त्या मुलाच्या नातेवाईकांनी हा घडलेला प्रकार सांगितला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.