विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यात विकासाऐवजी आश्वासने देऊन जनतेला नादी लावण्याचे काम सुरू आहे. याला जनता वैतागली आहे. विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच सोडवू शकतो, अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्या विश्वासाच्या आधारावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच नुकत्याच पार पडलेल्या चांदेकसारे गटात पक्षाला यश मिळाले. या यशाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आघाडी सेल तालुकाध्यक्ष निवडीप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. यावेळी महिला सेल अध्यक्ष चित्राताई बर्डे, युवती सेल अध्यक्ष स्वप्नजा वाबळे, सेवा दल सेलचे दिलीपराव बोरनारे, विद्यार्थी सेलचे संकेत कडवे, अल्पसंख्यांक सेल कौसरभाई सय्यद, मागासवर्गीय सुनील मोकळ, डॉक्टर सेल डॉ. विनय गिडगे, वकील सेल ॲड. रमेश गव्हाणे, अपंग सेल परमेश्वर कराळे, ग्रंथालय सेल विशाल देशमुख, किसान सेल रविंद्र पिंपरकर, सोशल मिडीया सेल दिलीप चिंधे, सहकार सेल नितीन शिंदे, कामगार सेल नारायण होन, ज्येष्ठ नागरिक सेल बाबुराव कोल्हे, ओबीसी सेल जगन बागल आदी तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली.आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, जि.प. सदस्य सुधाकर दंडवते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे, बाळासाहेब बारहाते, हरिभाऊ शिंदे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्रशांत वाबळे यांच्यासह कायकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.