राहाता येथे शोरूममधून २१ टीव्हींसह पावणे सात लाखांचा ऐवज लंपास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता शहरात दिवसेंदिवस चोऱ्या वाढत आहेत. त्याचप्रमाणे मटका, जुगार, गुटखा, जोरात चालू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसविणे काळाची गरज असून त्याचप्रमाणे रोडरोमिओंची संख्याही वाढत आहे. पोलिसांचा व कायद्याचा धाक निर्माण झाला नाही, तर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती शहरातील सुज्ञ नागरीकांना वाटत आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शहरातील साईराज सेल्स शोरुमच्या मागील दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून आत प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी नामांकित कंपनीचे २१ एल.ई.डी. टीव्ही व रोख रक्कम वीस हजार रुपये असा सुमारे पावणे सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. . याबाबत राहाता पोलीस ठाण्यात शोरुम मालक विनोद बाबासाहेब भोकरे (वय ३५, रा. कनकुरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

त्यात म्हटले की, माझे नगर- मनमाड महामार्गालगत कानडे हॉस्पिटलजवळ साईराज सेल्स शोरुम आहे. काल १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेलो असता १ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. व व्हिडीओकॉन, सोनी, सॅमसंग, इंडेक्स, अशा नामांकित कंपन्यांचे मिळून २१ एलईडी टी.व्ही. संच व रोख वीस हजार रुपये असा सुमारे पावणेसात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. 

याबाबतची माहिती आसपासच्या लोकांकडून मिळाल्यानंतर दुकानाकडे गेलो असता मागील दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर आतमध्ये खातरजमा केली असता सामानाची उचकापाचक करुन एलईडी टी.व्ही. चोरुन नेल्याचे भोकरे यांच्या निदर्शनास आले. चोरी झाल्याची माहिती मी पोलिसांना दिली. 

त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. राहाता शहरात भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पवार यांच्यासह श्वानपथकाने भेट दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.