राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले नेवासा तालुक्यात सक्रिय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गडाख-घुले राष्ट्रवादीत एकत्र असताना भाजपाचे नेवाशाचे आ. बाळासाहेब मुरकूटे यांच्या मागे उभी राहीलेली घुलेंची रसद आता घुले स्वत: सक्रिय झाल्याने तालुक्यात भाजपची ताकद कमी झाली आहे. याशिवाय अनेक पारंपारिक गडाख विरोधकांचा गेल्या तीन वर्षांत आ.मुरकूटे यांच्याकडून भ्रमनिरास झाल्यामुळे घुलेंशी सलगी वाढवत असल्याचे चित्र खूप काही सांगून जात आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आ.चंद्रशेखर घुले नेवासा तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या शाखा उद्घाटनांच्या निमित्ताने त्यांनी आता गडाखांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या खरवंडी, चांदा, सोनई गटांकडे जोरदार आगेकूच सुरु केली आहे.

नेवासा तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज घराणी समजल्या जाणाऱ्या घुले व गडाख यांनी गेल्या जिल्हा परिषद निवडणूकांपासून एकमेकांविरोधात टोकाची राजकीय भुमिका जाहिर करुन राजकीय समिकरणेच बदलवून टाकली आहेत. दोघेही राष्ट्रवादीत असताना त्यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाचा फायदा घेऊन अनेकांना झाला.

ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील प्रेमापोटी गडाख-घुले उघड भुमिका घेऊन एकमेकांना विरोध करण्याचे टाळत होते. परंतू माजी आ.शंकरराव गडाख यांनी अखेर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांचे निमित्त साधून धाडस करत या वादाला तोंड फोडले. त्यांनी घुलेंविरोधात उघडपणे तोफ डागत थेट राष्ट्रवादीचाच त्याग करण्याचा निर्णय घेऊन खुद्द घुलेंनाही मोठा राजकीय झटका दिला.

त्यातून त्यांना सावरण्यास बराच कालावधी लागल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नेवासा नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीचे पानीपत झाले. याबाबत थेट राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील नेतृत्वाने उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर घुलेंनी नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरु केली आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष संघटनेत पदे देऊन सक्रिय करण्यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे.

त्याचबरोबर गडाखांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या खरवंडी, चांदा, सोनई गटातील असंतुष्ट गडाख विरोधकांना सन्मानपूर्वक जवळ करण्यात त्यांना चांगलेच यश आल्याचे दिसून येते. याच लोकांना बळ देऊन त्यांना राष्ट्रवादीत सक्रिय करण्याचा धडाका घुले यांनी सुरु केला आहे. पक्षाच्या शाखा उद्घाटनांच्या निमित्ताने घुले स्वत: गडाखांच्या बालेकिल्ल्यात फिरु लागल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.