अहमदनगर जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पावसाने यंदा अहमदनगर जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. आतापर्यंत या जिल्ह्यात एकूण ४९८ मिमी पाऊस पडला असून, सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. येथे दरवर्षी सरासरी ४९७ मिमी पावसाची नोंद होते. अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यंदा येथील जलाशयांतील साठा देखील वाढला आहे. सीना धरण आठ दिवसांत ८२ टक्के भरले. मागील काही वर्षे या जिल्ह्याने दुष्काळच पाहिला आहे. यामुळे येथील शेती आणि अन्य अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. मागील वर्षी सुरुवातीस जोरदार पाऊस झाला होता, तर त्यानंतर थेट परतीचाच पाऊस पडला होता.

यंदा मात्र परिस्थिती उत्तम असून, मागील आठ दिवसांत झालेल्या पावसाने सरासरी भरून काढली आहे. यंदा अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तसेच नेवासा, राहाता, कर्जत आणि जामखेड या तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. 

मात्र, कोपरगावात यंदा पावसाचे प्रमाण जरा घटलेच आहे. नगर जिल्ह्यातील एकूण नऊ धरणे आहेत. त्यापैकी भंडारदरा महिनाभरापूर्वीच भरले असून, निवंडे धरण भरण्याच्या तयारीत आहे. तसेच मुळामध्ये ९८ टक्के जलसाठा झाला आहे. 

आढळा पूर्णपणे भरले आहे. तसेच मांडओहोठ, घाटशीळ, घोड, खैरी आणि सीना प्रकल्पांमध्ये यंदा उत्तम जलसाठा आहे. सीना प्रकल्पात १५ दिवसांपूर्वी १० टक्केच पाणी होते, तर आजमितीस ८२ टक्के पाणी शिल्लक आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.