भंडारदरा धरणाचा वीजपुरवठा खंडीत ३८ लाखांचे वीज बिल थकले,सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरणाचा थकित वीज बिला अभावी विजपुरवठा खंडीत केला गेला असुन सलग दोन-तीन दिवस सुट्टी असल्या कारणाने महावितरणाचे ऑफीशियल कामकाज पुर्ण होऊ शकणार नाही.त्यामुळे अजुन किती दिवस भंडारदरा धरण अंधारात राहणार आहे ? हा प्रश्न अनुत्तरीच आहे . 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भंडारदरा धरणाचा काल संध्याकाळपासुन महावितरण कंपनीने विजप्रवाह विजेचे बिल न भरल्यामुळे बंद केला आहे . भंडारदरा धरणावर बऱ्याच वर्षापासुन ३३ के.व्ही उच्च दाबाची वीजवाहीनी असुन या वीजवाहीनीचा भंडारदरा धरणावरील प्रकाश दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, धरणाचे दरवाजे उघडझाप करण्यासाठी विजेचा वापर याशिवाय भंडारदरा धरणाचे विश्रामगृह, धरणावरील कर्मचाऱ्यांची वसाहत व पिण्यासाठी लागणारे पाणी ईत्यादी कारणास्तव वापर होत असतो.यामुळे साहजिकच वीजबिल मोठ्या प्रमाणावर येते. 

भंडारदरा धरणशाखेकडुन वीज कंपनीला ३८ लाख ८० हजार रुपये येणे आहे . हे बिल वीज कंपनीला अदा न केल्यामुळे ३१ तारखेला रात्रीच विजप्रवाह संपुर्णपणे खंडीत केला गेला आहे .भंडारदरा धरण सध्या पुर्ण क्षमतेने भरलेले असताना धरणावरील विज प्रवाह खंडित होणे हे अडचणीचे ठरु शकणार आहे. 

याशिवाय या धरणाला अगोदरच सुरक्षेच्या कारणास्तव 'हाय अलर्ट' देण्यात आलेला असतानाही धरणाला अंधारात ठेवणे धोकादायक आहे. या धरणाचा वीज प्रवाह खंडीत केला गेल्यामुळे धरणाच्या वसाहतीत राहणाऱ्या महिलांना भर पावसाळ्यातही धरणातुनच डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहण्याची वेळ आली आहे. 

भंडारदरा धरणाला जी ३३ के.व्ही वीज पुरविली जात होती, त्या वीजवाहीनीची आता गरज राहीली नसल्याचे वाटत असल्याने भंडारदरा धरणशाखेने महावितरण कंपनीकडे ११ के.व्हीच्या वीजवाहीनीही मागणी केली आहे. सलग दोन-तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्यामुळे व नविन विजवाहीनीसाठी कमीत कमी तिन ते चार दिवस लागणार असुन तोपर्यंत भंडारदरा धरणावरील विजप्रवाह खंडीतच राहणार असल्याची माहीत धरण शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.