4 महिन्यांपूर्वी बांधलेल्या गारगुंडीच्या शाळेला गळती, अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन.

दैनिक दिव्य मराठी  :पारनेर तालुक्यातील शिक्षकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या गारगुंडी गावातील अवघ्या महिन्यांपूर्वी ११ लाख रुपये खर्चून बांधलेल्या शाळेच्या नवीन इमारतीला गळती लागली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. टक्केवारीच्या खेळात लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचे काम जिल्हा परिषद करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

ज्येेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले. पहिल्याच पावसात शाळा गळत असल्याचे दिसून आले. शाळेत पाणीच पाणी साचले गेले. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली, पण काहीही फरक पडला नाही, आता या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना लागली आहे.

निंबोडीसारखी परिस्थिती येऊ नये अशीच प्रार्थना ग्रामस्थ करत आहेत. काही अनर्थ होण्याच्या आत या शाळेची दुरुस्ती करावी; अन्यथा शाळा बंद करावी लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. अंगणवाडीची इमारतही सुमारे १० वर्षांपूर्वीपासून धोकादायक आहे, म्हणून नवीन इमारत मंजूर झाली.

कामही सुरू केले परंतु ठेकेदार पदाधिकाऱ्यांच्या खेळात काम बंद पडले, नंतर चौकशी सुरू झाली, पदाधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम भरली पण जवळजवळ वर्षांपासून अर्धवट काम करून पडलेल्या नवीन अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण करण्यास मुहूर्त काही मिळेना. 

ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु उदासीन प्रशासनाने टोलवाटोलवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांच्या मागणीला पाने पुसली, परिणामी अनेक वर्षांपासून लहान लहान मुले जुन्याच धोकादायक इमारतीमध्ये बसत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.