श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा,दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शनिवार (दि.२) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यालगत अवैधपणे सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.या छाप्यात तब्बल सात जणांना ताब्यात घेतले तर दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

श्रीगोंदा पेडगाव रस्त्यालगत आडोश्याला एका शेतात काहीजन अवैधपणे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलिसांचे पथक तात्काळ या परिसरात गेले असता या ठिकाणी जुगार खेळात असलेले नाना धोंडिबा आमले (रा.श्रीगोंदा), गोरख बाळू गांजुरे, कलीम समशेर जकाते,हबीब जकाते, मच्छिंद्र अंबर वाकडे, बयाजी दत्तात्रय धेंडे यांना पकडले. मात्र संतोष खेतमाळीस हा पळून गेला. या ठिकाणी जुगाराचे साहित्य व रोख रक्क्म १८हजार ६०० रूपये, व एक दुचाकी असा एकूण एक लाख, ९६हजार, ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसायाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.