जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे थैमान, ८ महिन्यात ३६ जण दगावले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या आठमहिन्यात नगर जिल्ह्यातील ३६ जणांचा स्वाईन फ्लू या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाने दिली असून. सध्या राज्यभरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या रोगाच्या जीवाणूंचा वेगाने फैलाव होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर शहरातील ८ जणांना स्वाईन फ्लू या आजाराची लागण झाली होती.त्यातील ५ जणांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करून ते बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.तसेच इतर तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जानेवारी २०१७ पासून जिल्ह्यात ३६जण दगावले आहेत.यामध्ये शहरात दोघांचा समावेश आहे.या रूग्णांवर पुणे व मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दगावलेल्यापैकी एकास पुण्यातच याची बाधा झाल्याचा संशय आहे. मागील वर्षी देशभरात एकूण अकराशे लोकांचा या आजाराने मृत्यू झाला होता.

यात राज्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. या आजाराने दगावलेल्या व्यक्तींच्या घराची मनपाच्या आरोग्य विभागाने तपासणी केली असता,याचे विषाणू आढळून आले नाहीत. परिणामी या रोगाची लागण बाहेरील शहरात झाल्याचे सांगण्यात येते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.