आठ दिवसांनंतर 'त्याच्या' मृतदेहावर झाले अंत्यसंस्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अंगात काळा कोट, खिशाला दोन पेन, डोळ्यावर चष्मा आणि दिवंगत खा. गोविंदराव आदिक यांचा खंदा कार्यकर्ता एवढीच काय ती ओळख. येथील तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयातील गरजवंतांचे कामे करणे एवढाच काय तो उदरनिर्वाहासाठीचा उद्योग. मिळेल ते पैसे घेऊन गरजुंची सेवा करत जीवन जगणाऱ्या या अवलियाच्या जाण्याची खबर तब्बल सात दिवसही कोणालाही नव्हती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेवटी आठव्या दिवशी त्याच्या मामाने त्याच्या घरात डोकावले असता त्याचा जीर्ण झालेला मृतदेह नजरेस पडला. त्यानंतर काल (दि.१) त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास विठ्ठल डिके (वय ४५, रा. भामाठाण) येथील तहसील कार्यालयात येणाऱ्या गरजवंतांचे कामे करण्यात सदैव हजर राहत. आईवडिलांचे छत्र बालपणीचे हरपले. त्यानंतर आजीने लहानाचे मोठे केले. चार-पाच वर्षांपूर्वी आजीचेही निधन झाल्याने पाठीमागे कोणीच नव्हते. 

अलिकडील काळात पायाला झालेल्या जखमांमुळे फारसे बाहेर जाणे येणे नव्हते. निधनापूर्वी अविनाश आदिक यांच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी शेवटची. त्यानंतर गाडी घरात लावून आतून कुलूप लावून झोपून घेतले. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. घरासमोर बाभळीचे कुंपन व हेकेखोर स्वभावामुळे गावातील कोणीही त्यांच्या घराकडे फिरकत नसत. मात्र, गावातच राहणारे त्यांचे मामा भाऊसाहेब नामदेव बनसोडे यांना विलास न दिसल्याने ते काळजीपोटी त्यांच्या घराकडे आले. 

बाहेरून मोबाईल लावला तर रिंग येऊन कट झाला. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी खिडकी उघडून पाहिली असता उग्र वास आला. अंथरूणापासून पाण्याच्या माठाजवळ डिके यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह नजरेस पडला. मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत असल्याने बऱ्याच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. 

पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. डिके यांच्या पाठीमागे कोणीही नसल्याने व कोणाची तक्रार नसल्याने तसेच मृतदेह शवविच्छेदनाच्या अवस्थेत नसल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार काल (दि. १) त्यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.