१६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी जाणार संपावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सातव्या वेतन आयोगानुसार पदनिहाय वेतन श्रेणी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर न्याय हक्­काच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. हा बेमुदत संप १६ ऑक्टोंबर मध्यरात्रीपासून पुकारण्यात आल्याची कायदेशीर नोटीस राज्य परिवहन महामंडळाचे व्यस्थापक संचालक रणजित सिंह देवल यांना कामगार संघटने सहित इंटकने बजावली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दरम्यान संपाची नोटीस दिल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या वतीने कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दि. ६ ऑक्टोंबररोजी चर्चेस आमंत्रित केल्याचे समजते. त्यानंतर ११ ऑक्टोंबर रोजी संपास पाठिंबा देणाऱ्या सर्व कामगार संघटनांचा संयुक्तिक मेळावा औरंगाबाद येथे पार पडणार आहे. या मेळाव्यात एसटी कामगारांचा लढा एकजुटीने निर्णायक वळणावर नेण्याची रणनीती ठरणार आहे.

प्रमुख मागण्या: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह ७ वा वेतन आयोग रापम कामगारांना लागू करावा.थकीत ७ टक्­के महागाई भत्ता थकबाकीसह द्यावा. सर्व श्रमिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर आकसाने होणारी कारवाई थांबवावी. तसेच कायदे, करार, परिपत्रकाचा भंग करून घेतलेले निर्णय रद्द करावेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मान्यताप्राप्त संघटनेने दि.१६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत बेमुदत संपावर जाण्याची कायदेशीर नोटीस महाराष्ट्र एसटी कामगार संघटना या मान्यताप्राप्त संघटनेने दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.