गर्भलिंग निदान प्रकरणी पती-पत्नीस कारावास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भावजयीला सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करण्यास प्रवृत्त करून त्यासाठी डॉक्‍टरांची मदत मागण्याचा प्रयत्न केला. गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून रेणुका मच्छिंद्र घोलप व तिचा पती मच्छिंद्र घोलप या दाम्पत्यास राहाता न्यायालयाचे न्यायाधीश सुहास भोसले यांनी प्रत्येकी सहा महिन्यांचा कारावास व प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.



ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गेल्या 25 डिसेंबर 2012 रोजी ही घटना उघडकीस आली होती. आरोपी रेणुका घोलप हिची भावजय ज्योती दिलीप गवळी (रा. धामणगाव, ता. येवला, जि. नाशिक) या गर्भवती असताना त्यांची सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करावे, असा आग्रह या दाम्पत्याने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष मैड यांच्याकडे धरला होता. त्यांनी ही माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत त्रिंबक खोत यांना कळविली. त्यांनी अन्य सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तेथे छापा टाकला.

या दाम्पत्यावर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा तपास तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. खोत यांनी केला. या घटनेत न्यायालयात एकूण 9 साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक रवींद्र निटूरकर, येवले तालुक्‍यातील धामणगाव येथील परिचारिका एस. बी. शेलार, पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, तसेच नायब तहसीलदार राहुल कोताडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील म्हणून ऍड. बी. एफ. हिरे यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.