पूर्व वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध - डॉ.सुजय विखे पाटील.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निश्चितपणे येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोळी टाकून सुरु केला जाईल. संचालक मंडळ आपली जबाबदारी काटेकोरपणे पाळत आहे. सभासदांनीही ऊस देणे ही आपली जबाबदारी समजून कारखा­न्यास गाळपासाठी ऊस उपलब्ध करुन द्यावा. नक्कीच या कारखा­न्यास पूर्व वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तो शब्द आम्ही निश्चितच पाळू व कारखाना सुस्थितीत आणू, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे कारखा­न्याचे मार्गदर्शक डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखा­न्याची ६२ वी अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधरण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखा­न्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

डॉ.विखे पाटील म्हणाले, सत्ता आल्यापासून आजपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण होता. सर्वांच्या सहकार्यामुळे आज आम्ही यशाच्या दारात उभे आहोत. कर्जाचे पुर्न:गठणासाठी फार मोठी लढाई करावी लागली. ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या पाठिंब्यामुळे कर्जाचे पुर्न:गठण होऊ शकले.

निवडणुकीनंतर कारखाना चालू होणे संदर्भामध्ये मोठ्या चर्चा तालुक्यात रंगू लागल्या. कारखा­न्याची आर्थिक परिस्थिती बघता कारखाना सुरु करु शकतो की, नाही याबाबत मनामध्ये भिती होती. मात्र, सर्व अडथळे पार करत आज सर्वांच्या सहकार्याने कारखाना सुरु होण्याच्या दृष्टीकोनातून काम सुरु आहे. 

प्रवरा व गणेशच्या १३० कामगारांच्या सोबतीने राहुरीचे कामगार मेहनतीने कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. संचालक मंडळ आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. सभासदांनीही कारखा­न्यास ऊस देऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

मागील एफआरपी दोन टप्प्यात देऊ, असे आवाहन सभासदांना केले असता यात सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. कारखा­न्याच्या प्रोग्रामनुसार सभासदांनी ऊस तोडणी करुन देऊन सहकार्य करावे. तीन हजार टन ऊस रोज गाळप केल्यास कारखाना नक्कीच सुस्थितीत येणार आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.