आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कर्जुले पठार येथील अमित शांताराम गुंजाळ (वय १९) हा महाविद्यालयीन तरुण आंघोळीसाठी गेला असता शेततळ्यातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास लक्षात आली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम गुंजाळ यांचा मुलगा अमित हा साकूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी तो गावातीलच विकास पुरुषोत्तम पोखरकर यांच्या शेततळ्यात आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्याचवेळी त्याचे चुलते रोहिदास गुंजाळ हे त्या ठिकाणाहून जात असता त्यांना अमितचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवली. त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांना माहिती दिली. 

त्यानंतर निघोट यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी, सहाय्यक फौजदार कैलास परांडे, पोलिस नाईक राजेंद्र लांघी, संतोष खैरे, चालक संतोष फड घटनास्थळी आले. नागरिकांच्या मदतीने अमितचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला व रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी कुटीर रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी रोहिदास गुंजाळ यांनी दिलेली खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास परांडे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.