अल्पवयीन मुलीचा विनयभंग,ॲसिड फेकून मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर येथील एका अल्पवयीन तरुणीचा रस्त्यात हात धरून तिची छेड काढली व हा प्रकार कुणालाही सांगितल्यास अंगावर ॲसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी मुश्ताक अकबर शेख (वय २१, रा. दिल्ली नाका) याला अटक केली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका महाविद्यालयात १२वीत शिक्षण घेणारी अल्पवयीन तरुणी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महाविद्यालयात निघाली होती. दीड महिन्यापासून तिचा पाठलाग करणाऱ्या मुश्ताक शेख याने गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तिला रस्त्यात अडवून तिचा हात धरला व तुझ्या अंगावर ॲसिड फेकून तुला जीवे मारुन टाकील तसेच हा प्रकार कोणालाही न सांगण्याचीही धमकी दिली.

याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी मुश्ताक शेख याच्या विरुद्ध गु.रजि.नं. २०८/२०१७ नुसार भा.दं.वि. कलम ३५४ (ड), ५०६, बाल संरक्षण लैंगिक अधिनियम २०१२चे कलम ११, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाळ उंबरकर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.