चाळीस वर्षापासून सुरु असलेली भगवान गडावरील मेळाव्याची परंपरा खंडित.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महसूल प्रशासनाने भगवान गडावरील मेळाव्याला परवानगी नाकारल्याने भगवान बाबांच्या जनमगावी (सुपे- सावरगाव, ता.पाटोदा जि.बीड) येथे सभा घेण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना घ्यावा लागला. भगवानगडही संताची भूमी असल्याने तेथे काही अनुचीत प्रकार घडु नये. यासाठी खबरदारी घेण्यासाठी निर्णय झाला असला, तरी मुंडे समर्थंकात यामुळे अस्वस्थता आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या चाळीस वर्षापासून सुरु केलेली भगवान गडावरील मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. भगवानगड ही संत भगवानबाबांची कर्मभूमी आहे. याच भगवान गडावरुन आपली अध्यात्मिक शक्ती वापरुन बाबांनी अनेक भक्तांना भक्तीरस पाजला. 

संत म्हणून भगवान बाबांची महती जगभर पसरली. देशात संत भगवान बाबांचा नामघोष करण्याचे काम भगवान भक्तासोबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केले. गडावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना गडावर आणले. मुंडे यांनी भगवान गडावरुनच आपले राजकीय घडामोडीचे संकेत देवून दिशाही स्पष्ट केल्या. 

गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांना गादीवर बसविण्यात मुंडे यांचीच भूमिका महत्त्वाची होती. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनीच त्यांचा वारसा चालविला. मात्र २०१६ साली दसरा मेळावा गडावर होणार नाही. गडावर केवळ कीर्तनकारांचा आवाज घुमेल, राजकीय भाषण होणार नाही, असा निर्णय महतांनी घेतला. 

महंत व पंकजा असा संघर्ष पेटला. दोन्ही बाजूंकडुन गंभीर स्वरुपाचे आरोप-प्रत्यरोप झाले. अखेर गेल्या वर्षी गडाच्या पायथ्याला मेळावा झाला. यावर्षी मेळावा गडावरच होणार असी भूमिका मुंडे यांच्या समर्थकांनी घेतली. महसूल प्रशासनाला परवानगी मागितली. 

गडाचे महंत यांनी गडावर राजकीय भाषण होणार नाही, परवानगी देवु नये असे लेखी दिले. पाथर्डीच्या तहसीलदारांनी परवानगी नाकारली. मुंडे समर्थकांनी सरकारचा निषेध करीत सरकार महंतांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोपही केला. 

भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेण्याची मागणी तेथील भक्तांनी मुंडे यांच्याकडे केलेली होती. मुंडे यांनीही तातडीने निर्णय जाहीर केला. भगवान बाबांचे भक्त यामुळे आणखी संभ्रमात पडले आहेत. दसऱ्याला बाबांच्या दर्शनाला भगवान गडावर जायचे की मुंडे यांच्या मेळाव्याला सावरगावला जायचे. 

अशी व्दिधा अवस्था भक्त व समर्थकांमध्ये आहे. महंताच्या विरुध्द मुंडे समर्थक आक्रमक होत आहेत. महंताचा एकेरी उल्लेख करीत समाजाच्या एकजुटीला महंतामुळे ग्रहण लागल्याची भावना उघडपणे बोलले जाते आहे. यामुळे मुंडे समर्थकांमधे अस्वस्थता पसरली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.