कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप व राष्ट्रवादीत स्पर्धा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव नगरपरिषदेसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ५९ लाख रुपये खर्चाच्या तीन अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या दोन ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत केल्याने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत या कामाचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागल्याचे जाणवले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दोन वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम झाले. पदाधिकारी एकत्र झाले. मात्र, त्यांच्या नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे टाळले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शेवगाव शहरातील वडार गल्ली ते बीएसएनएल कार्यालय, मोची गल्ली व गणपती मंदिर ते मारुती मंदिर रस्ता या तिनही कामांसाठी ५९ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. 

या कामांचा उद्घाटन समारंभ नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील लांडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आला होता. त्याबाबतच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्यानंतर भाजपच्या पादाधिकाऱ्यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते व नगरचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. 

एकाच कार्यक्रमाच्या दोन वेगवेगळया पत्रिका असल्याने नागरिक गोंधळून गेले.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी मोची गल्ली येथील कार्यक्रमास थोडा वेळ उपस्थिती लावली. मात्र, दोन कार्यक्रम पत्रिकांचा गोंधळ लक्षात आल्याने ते भाषण न करताच निघून गेले. 

तर सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते वडार गल्ली येथे रस्त्याचा शुभारंभ झाला. नगर परिषदेचे पदाधिकारी व दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित होते. नेत्यांनी मात्र एकमेकांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. शहरात हा चर्चेचा विषय झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.