वहाडणेंना पाठिंबा देण्याची धमक आमदारात नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माझ्या रक्‍तामध्ये भाजप आहे, पण मी भाजपमध्ये नाही. मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला शहरात फिरता येणार नाही. शहर विकासात आडवे आल्यास तुम्हाला राजकारणात आडवा केल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दांत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांना सुनावले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रभाग क्रमांक 6 मधील रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगळवारी झाला. शिवसेना नेते राजेंद्र झावरे आणि सतीश कृष्णानी यावेळी उपस्थित होते.

वहाडणे म्हणाले की, पालिका सभेत बहिष्कार टाकणारे मला येऊन भेटले. शहर विकासात राजकारण करणाराविरूध्द मीही राजकारण करील. निवडणूक संपली, राजकारण संपले असे मी जाहीर करून 31 नगरसेवकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली. 

पालिकेत 25-30 टक्केवारीच्या भ्रष्टाचारामुळे ठेकेदार कामे घेत नव्हते. मी आहे तोपर्यंत एक रुपयाचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. पालिकेत तुमच्या चमच्यांनी काय केले? 1 कोटीचा जलतरण तलाव, 80 लाखांचा कत्तलखाना, पालखी रस्ता ही कामे कुणी वाटली? असा सवाल वहाडणे यांनी केला. काळे यांनी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक शेवटपर्यंत वहाडणे यांच्यासोबत राहतील, अशी ग्वाही दिली.

राजेंद्र झावरे म्हणाले की, वहाडणेंना पाठिंबा देण्याची दानत आमदारात नाही. भाजपची निष्ठा कुठे आहे हे सर्वांना माहिती आहे. वहाडणेंमध्ये काम करण्याची धमक असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पालिकेत कुणी खोडा घातला तर आम्ही भक्कम आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरसेवक संदीप वर्पे आणि अशोक खांबेकर यांचे यावेळी भाषण झाले. नगरसेवक मंदार पहाडे, वर्षा गंगुले, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, वीरेन बोरावके, माधवी वाकचौरे, संदीप पगारे, महेमूद सय्यद, सुनील गंगुले, विनायक गायकवाड यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिभा शिलेदार यांनी केले. सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.