स्विफ्ट कार पलटी होवून एक ठार, चारजण जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील देवगाव शिवारात गुंजाळ वस्तीजवळ स्विफ्ट कारचे ब्रेक निकामी झाल्याने कार पलटी होवून एकजण जागीच ठार, तर चारजण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. आप्पासाहेब मधुकर देशमुख (वय ५५, रा.पिंपरणे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे पिंपरणे गावावर शोककळा पसरली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपरणे येथील आप्पासाहेब देशमुख, उल्हास रामनाथ देशमुख, रत्नाकर जयसिंग देशमुख, सुमनबाई मधुकरराव देशमुख, मंगल दादासाहेब देशमुख हे सर्वजण स्विफ्ट कार (क्र. एमएच १७ एई ६२५०)मधून गुरुवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असणाऱ्या नेऊरगाव येथे दशक्रियाविधीसाठी गेले होते.

कार्यक्रम आटोपून ते संगमनेर मार्गे पिंपरणे याठिकाणी येत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवगाव शिवारातील गुंजाळ वस्तीजवळ अचानक त्यांच्या गाडीचा बे्रक निकामी झाला आणि गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या. त्यामुळे देशमुख हे अपघातात गंभीर जखमी झाले. 

आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना व त्यांची आई, भावजय, गाडी चालक व आणखी एकजण यांना बाहेर काढले व औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये आणले. पण औषधोपचारापूर्वीच आप्पासाहेब देशमुख यांचा मृत्यू झाला होता. इतर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा अप्पासाहेब देशमुख यांच्यावर पिंपरणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आप्पासाहेब देशमुख हे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख यांचे बंधू होते. याबाबत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्य हवालदार आयुब शेख करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.