भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला परवानगी नाकारली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला तहसीलदार नामदेव पाटील यांनी परवानगी नाकारली असून, पोलिसांचा अहवाल व गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी गडावर मेळावा घेण्यास केलेला विरोध. यामुळे गडावर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता, श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या पूर्व परवानगीशिवाय सभेची परवानगी देता येणार नाही. असे तहसीलदार पाटील यांनी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

श्रीक्षेत्र भगवान गडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी. असा लेखी अर्ज दसरा मेळावा कृती समितीच्यावतीने माणिक खेडकर यांनी बुधवारी दि. २७ रोजी दिला होता. भगवान गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना लेखी पत्र देवून , भगवान गडावर कोणत्याही राजकीय व्यक्तीला दसरा मेळाव्याला निमंत्रीत करण्यात आले नसून. राजकीय भाषण करण्यास गडाच्या विश्वस्त मंडळाने बंदी केली असल्याचे कळविले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

डॉ.नामदेवशास्त्री यांनी काल २८ सप्टेंबर रोजीही महसूल प्रशासनाने त्यांचा अभिप्राय मागीतला असता. गडावर परवानगी देवू नये असे कळविले आहे. वनविभागाने मेळाव्याला जागा देता येणार नाही. गडाच्या हद्दीत मेळावा घेतल्यास आमची काही हरकत नाही असे कळविले. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी गडावर मेळावा होवू नये असे लेखी कळविले असून, ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. 

मात्र पंकजा मुंडे यांचे समर्थक मेळावा व्हावा यासाठी आक्रमक आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असे कळविले आहे. त्यामुळे वरील सर्व परिस्थिती पाहता कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता भगवान गडाच्या विश्वस्त समितीच्या पुर्व परवानगी शिवाय सभेची परवानगी देता येणार नाही असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी कृती समितीला लेखी उत्तर दिले आहे. 

अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

मुंडे यांना यावर्षी मेळावा सावरगाव येथे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर मेळाव्याच्या तयारीला पदाधिकारी लागले आहेत. श्रीक्षेत्र भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून मागील वर्षी बराच वाद झाला होता. गडावर मेळाव्याला परवानगी नाकारल्याने पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला होता. 

मेळावा जवळ येताच पुन्हा त्याच वादाला तोंड फुटले. गडावर कोणतीही राजकीय सभा नको, या भूमिकेवर महंत नामदेव शास्त्री ठाम आहेत. दरम्यान, मंगळवारी पंकजा मुंडे यांनी वाद टाळण्याच्या दृष्टीने दोन पावले मागे घेत महंतांना पत्र पाठवून लोकभावना लक्षात घेऊन गडावर मेळावा घेऊ देण्याची विनंती केली होती.

-------------------------------------------------
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.