निवडणुकीत विखे समर्थकच आमने-सामने.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार व ११ सदस्यांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहे. तसेच सरपंचपद सर्वसाधारण पुरूषासाठी सरपंचपदाची निवड पहिल्यांदाच थेट जनतेतून होणार असल्याने सहा उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रवरा परिसरातील सोनगाव हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांना मानणारे असल्यामुळे तीनही पॅनल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे. तसेच अपक्षांनी वेगळी मोट बांधली असून तेही चुरस देण्याच्या तयारीत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती. यंदा भाजपप्रणित, राष्ट्रवादी, मित्र पक्ष यांचे कोणतेही पॅनल नसल्यामुळे ही निवडणूक जवळजवळ ना. विखे प्रणित काँग्रेस समर्थकांमध्ये आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

सोनगाव ग्रामपंचायत चार प्रभाग असून अकरा सदस्य व सरपंचपदासाठी एक अशी कार्यकारणी आहे. गावची लोकसंख्या सोनगाव, अनापवाडी मिळून तीन हजार ४४६ असून दोन हजार ८२८ मतदार आहेत. जनसेवा मंडळाचे नेतृत्व पाराजी धनवट, मच्छिंद्र अंत्रे, अशोकराव अंत्रे हे करीत आहेत.ही निवडणूक ना. विखे समर्थकांमध्ये होत असून या सर्व लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.