नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेंडी बायपासजवळील शिवारात ३२ वर्षीय महिलेस नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. १६) रात्री आठ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २८) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील ३२ वर्षीय महिलेस कामाची गरज असल्याचे पाहून महादेव अशोक घोरपडे (वय २८, रा. वैजूबाभुळगाव, ता. पाथर्डी) याने तिला नोकरीस लावून देतो असे आमिष दाखविले. त्यासाठी सदर महिलेस नगर येथील नागापूर एमआयडीसी येथे बोलावून घेत काम शोधण्याकरिता तिला वडगाव गुप्ता शिवारातील शेंडी बायपासजवळ बोलावले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

त्यानंतर आरोपीने सदर महिलेस झाडीत नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच या प्रकाराची मोबाईलवर व्हिडीओ क्लिप केली असून ती क्लिप सोशल मिडियात टाकून बदनाम करीन अन तुझ्या कुटुंबियांना ठार मारीन अशी धमकी दिली.याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सदर महिलेच्या फिर्यादीवरुन बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे करत आहेत.

-------------------------------------------------
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.