कृषि विदयापीठातील तंञज्ञानाचा वापर करून शेती उत्‍पादन वाढविण्‍याची गरज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी आणि किसान आधार संमेलनासारखे कार्यक्रमराज्‍यभर होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर शेतीला जोडव्‍यवसायाची साथ आणि कृषि विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाची साथ देणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषि विदयापीठाच्‍या माध्‍यमातून संशोधनाचे चांगले काम सुरू आहे. सर्व शेतक-यांनी कृषि विदयापीठातील तंञज्ञानाचा वापर करून शेती उत्‍पादन वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा अहमदनगर यांचे सहकार्याने आयोजित न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिध्दी, उन्नत शेती – समृध्द शेतकरी, किसान आधार संमेलन 2017 चे उदघाटन कृषी व फलोत्पादन मंत्री फुंडकर याचे शुभहस्ते झाले.यावेळी पालकमंञी प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथ उपस्थित होते. खा. दिलीप गांधी, आ. भाऊसाहेब कांबळे, साईबाबा संस्‍थानचे उपाध्‍यक्ष श्री. चंद्रशेखर कदम, कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंह श्रीपाद, कार्यकारी परिषद सदस्य श्री. भास्करराव पाटील, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटेउपस्थित होते.

कृ‍षीमंत्री फुंडकर म्हणाले, उन्नत शेती – समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतक-यांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. लवकरच एक लाख यंत्रांचे वाटप करण्‍यात येणार असून मंडळ स्‍तरावर हवामान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मार्चपर्यंत दीड कोटी मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून तीन हजार कोटी खर्च करुन कोट्यवधी लीटर पाण्याची साठवण झाली आहे. शासन शेतक-यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असून महात्मा फुले कृषि विदयापीठाने हे सिध्द केले आहे की, कोरडवाहू भागातही फळबाग लागवड यशस्‍वी करता येते.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार या अभियानामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. परंतू पाणी ही राष्ट्रीय संपत्ती माणून त्याचा काटकसरीने वापर करावा. यासाठी प्रत्‍येक पिकाला सूक्ष्म सिंचनाची जोड दयावी. या कृषी विदयापीठांनी केलेले संशोधन उच्च दर्जाचे आहे.

कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, बदलत्या हवामानात शाश्वत उत्पादन मिळावे असे तंत्रज्ञान कृषि विदयापीठाने विकसीत केलेले आहे. या बदलत्या हवामानात शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळावे, यासाठी शेतक-यांनी या कृषी आधार संमेलनात सहभागी होऊन विदयापीठाचे तंत्रज्ञान बघावे, समजून घ्यावे, अवलंब करावे आणि काही शंका असतील तर शास्त्रज्ञांनी चर्चा करावी व तंत्रज्ञान समजून घ्यावे. तंत्रज्ञान प्रसार व्हावा आणि शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हाच या किसान आधार संमेलनाचा उददेश आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या, शेतकरी कुटूंबात महिला ही शेतीचा कणा आहे. त्यामुळे महिलांना कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले तर तंत्रज्ञानाचा योग्य प्रसार होऊन शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यासाठी कृषी विदयापीठांनी महिला प्रशिक्षण घ्यावे. याचबरोबर सेंद्रिय शेतीवर अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी खा. दिलीप गांधी, आ. प्रकाश गजभिये, आ. शिवाजीराव कर्डीले, कृषि आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषीमंत्री फुंडकर यांचे हस्ते हवामानाचा अंदाज दर्शविणारे एलअेडी स्क्रिनचे उदघाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी उदयान – विदया विभाग, पशुप्रदर्शन, 100 एकरावरील पिक प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाच्या विविध स्टॉलला भेट दिली.

यावेळी आ. लक्ष्मणराव ढोबळे, ॲड. तानाजी ढसाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, माजी कुलगुरु एस. एस. मगर, डॉ. टी. ए. मोरे, नियंत्रक श्री. विजय कोते, विदयापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी तर आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले, या किसान संमेलनाला अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, अशा विविध जिल्हातून मोठया संखेने शेतकरी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.