शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत मुलाने केला बापाचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतीच्या व शेळ्याच्या वाटपावरुन झालेल्या भांडणाचा मनात राग धरून मुलानेच बापाचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निघृर्ण खून केल्याची घटना बुधवारी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील गावडेवाडीत घडली आहे. पारनेर पोलिसांनी आरोपी देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) याला अटक केली आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या घटनेची पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील गावडेवाडी येथील रहिवासी मारुती सखाराम गावडे (वय ६५) यांच्याशी त्याचा मुलगा देवराम मारुती गावडे याचे शेतीवाटप आणि शेळ्या वाटपावरुन बुधवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले.

या भांडणाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत पोहचले. या भांडणाचा मनात राग धरुन देवराम मारुती गावडे याने आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोळ्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. यामध्ये मोठा रक्तस्त्राव होवून जखमी मारुती सखाराम गावडे हे मयत झाले.

पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र पवार बीट अंमलदार अण्णा चव्हाण, संदीप चौधरी, अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड, आबा ढोले, आसाराम क्षीरसागर या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जावून आरोपी देवराम मारुती गावडे याला ताब्यात घेत अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अधिक तपास पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र पवार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.