महिला आहे म्हणून एकटी समजू नका, दुर्गा झाले तर पुरून उरेल -आ.स्नेहलता कोल्हे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वारंवार माझे नाव घेऊन ओरडण्यापेक्षा कामे करा; कोण कोणाला भेटले, कोणाबरोबर गेले याचे मला काही घेणे, देणे नसून अशांना मी फारशी किंमत देत नाही. महिला आहे म्हणून एकटी समजू नका, दुर्गा झाले तर पुरून उरेल, असा इशारा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी थेट पालिका सभागृहात आढावा बैठक घेऊन चांगलाच दणका दिला. बैठकीस वहाडणे आलेच नाहीत. आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी म्हणून मी पालिकेच्या प्रश्नात कायम पुढाकार घेतला; पण वहाडणे यांनी नकारात्मक भूमिका घेतली. आजही फोन करून ते बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यांना कमीपणा वाटतो का ?

जुन्या गोष्टी उगळुन किती दिवस मतदारांना झुलवणार ? तुमचे आमचे बांधाला बांध नाहीत. अडविले कुठे ते सांगा? लोकांना कामे हवीत. २० कोटींचा निधी पडून आहे, पैसे असताना लोकांना वेठीस का धरता? कमीपणा वाटत नसेल तर, अडले नडले तर मी पाठीशी आहे. माहिती अधिकारात अडचणी उभ्या करता, मग त्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे. असा टोला त्यांनी लगावला. 

माझी बांधीलकी जनतेसाठी आहे. कोण कोणाबरोबर आहे, कोण पक्षाच्या मागे आहे, याला मी फारशी किंमत देत नाही. त्यात मला सारस्यही नाही. निळवंडेचे पाणी येणारच आहे. कुठेतरी एकत्र यायचे, पत्रकबाजी करायची, लोकांची दिशाभूल करायची, असे एकतरी उदाहरण द्या. समोर यायचे टाळायचे, हे दुतोंडी लक्षण असल्याची टीका आ. कोल्हे यांनी केली. 

यावेळी रविंद्र पाठक, कैलास जाधव, योगेश बागुल, संजय सातभाई, गिरमे, अजिनाथ ढाकणे, निखील निखाडे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. राजकीय पक्ष व नेत्याच्या महत्त्वकांक्षा तसेच कुरघोडीतून नवीन समीकरणे जुळण्यासाठी ध्रुवीकरण होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.