ज्यांनी संस्था बुडविल्या, तेच सहकार कसा चालवायचा हे शिकवत आहेत - आ.राहुल जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :'कुकडी' कारखान्यात सतत नवनवीन तांत्रिक बदल केले आहेत. आसवनी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पांसह कारखान्याची गाळपक्षमता देखील वाढविली. मागील हंगामात 'कुकडी' कारखान्याने इतरांपेक्षा दोनशे रुपयांनी अधिक बाजार दिला असून, बाजारभावाच्या बाबतीत 'कुकडी' कारखाना जिल्ह्यात 'नंबर वन' असल्याचे प्रतिपादन 'कुकडी' कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

'कुकडी' कारखान्याच्या २० व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आ.जगताप म्हणाले, कारखान्यावरील कर्ज वाढले असल्याचे मान्य आहे. मात्र त्यासोबत कारखान्याचा विस्तार देखील झाला आहे. परिणामी उत्पन्न वाढणार असून त्यामुळे पुढील दोन वर्षांत कारखान्यावरील कर्ज फिटेल. मागील हंगामात ऊस कमी असताना कारखाना सरू केल्याने तोटा झाल्याचे दिसत असले तरी कारखाना बंद ठेवला असता तर अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले असते, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनशाम शेलार म्हणाले, वार्षिक अहवाल हा कारखान्याच्या कारभाराचा आरसा असतो. अहवाल बघता कारभार चिंताजनक असल्याचे चित्र दिसते. मागील हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस नसताना कारखाना सुरू केल्याने कोट्यवधींचा तोटा झाल्याचे चित्र आहे. कारखान्याचे नामांतर करण्याला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र कारखान्याच्या नावातून 'कुकडी' हा शब्द काढू नये.

दिनकर पंधरकर म्हणाले, कारखान्याच्या कारभाराला कधीच विरोध केला नाही. सभासदांसाठी आम्ही लढत आहोत. 'कुकडी' कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे.

जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्याऐवजी भाजप-शिवसेनेची कोळगाव गटात ताकद नाही. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळे राजकारण झाल्याने कोळगाव गटात 'गडबड' झाली.

माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे, अतुल लोखंडे, धोंडिबा लगड, वैशाली देवीकर, भाऊसाहेब इथापे, आर बी शिंदे, शिवदास जगताप, रवी बायकर आदींची भाषणे झाली. बाळासाहेब गिरमकर, उपाध्यक्ष विश्वास थोरात, सुभाष डांगे, विलासराव वाबळे, हरिदास शिर्के, संजय आनंदकर, संजय जामदार, बाळासाहेब मोहारे आदी उपस्थित होते.

काही लोक माझ्यामागे माझ्यावर टीका करतात. ज्यांनी संस्था बुडविल्या, तेच सहकार कसा चालवायचा हे शिकवत आहेत. ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी समोर बोलावे, त्यांना उत्तर देण्याची माझी तयारी आहे. एकदाचं 'दूध का दूध अन् पाणी का पाणी' होऊन जाऊ द्या, असे म्हणत आ.जगताप यांनी माजी मंत्री पाचपुते यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.