साईबाबांंच्या ९९ व्या पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पूर्ण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या ९९व्या पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पूर्ण झाली असून उत्‍सवाच्‍या पहिल्या दिवशी दि. २९ सप्‍टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता पालखीची मिरवणूक सुरू होईल. त्यानंतर श्रींची शेजारती होईल. दि. ३० सप्‍टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकडआरती होईल. उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, द्वारकामाई, चावडी व गुरुस्‍थान या ठिकाणी साईभक्‍त‍ विजया नायडू यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. तसेच मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व प्रवेशद्वारावर देखावा उभारण्‍यात आला आहे.

श्री साईबाबा समाधी शताब्‍दी सोहळ्यात ध्‍वजस्‍तंभ उभारणीसाठी हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त ए. एन. रेड्डी तर दि. १ ऑक्‍टोबर रोजी लेंडी बागेतील शताब्‍दी सोहळा ध्‍वजारोहण कार्यक्रमाच्‍या ठिकाणी सुशोभिकरणासाठी हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त प्रभाकर मुरुमकर यांनी देणगी दिलेली आहे. 

शताब्‍दी सोहळ्यात वर्षभर चालणाऱ्या धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांसाठी श्री साई मंदिर समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजकरीता सुरत येथील देणगीदार साईभक्‍त विकास अंशुभाई आहेर यांनी देणगी दिली आहे. 

शताब्‍दी महोत्‍सवात वाहनांच्‍या वाहनतळासाठी शिर्डीतील ग्रामस्‍थ नितिन उत्‍तमराव कोते व इतर, कैलास गोविंदराव कोते व अजित झुंबरलाला कुंकूलोळ व इतर, कमलाकर गणपतराव कोते व इतर, डॉ.एकनाथ भागचंद गोंदकर व शोभा एकनाथ गोंदकर, विजयकुमार मोहन बार्ली आणि बी.आर. मोहन राव आदींनी संस्‍थानला विनामोबदला जागा वापरास दिली आहे.

उत्‍सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी दिनांक २९ सप्‍टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समीहन चंद्रशेखर आठवले महाराज, पंढरपूर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर सायं. ७ ते १० यावेळेत पं. विजय घाटे, पुणे यांचा तालवाद्य कचेरी हा कार्यक्रम होणार आहे. 

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी सकाळी १० वाजता आठवले महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम व सायं. ७ ते ९ यावेळेत डॉ.अमृता व श्री.विजय वॉरीयर, बंगळूरु यांचा साईभजन संध्‍या हा कार्यक्रम होणार आहे. 

उत्‍सवाच्‍या तिसऱ्या दिवशी दिनांक ०१ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता आठवले महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर श्री हनुमान मंदिराशेजारी नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या श्री साई मंदिर समाधी शताब्‍दी मंडपाचे पुजन होवून सायं. ७.०० ते १०.०० यावेळेत प्रसिध्‍द गायक सुरेश वाडकर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार आहे. 

उत्‍सवाच्‍या सांगता दिनी दिनांक ०२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता आठवले महाराजांचा गोपाळ काला कीर्तनाचा कार्यक्रम तर सायं.७.०० ते १०.०० यावेळेत जगदीश पाटील, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून कीर्तन कार्यक्रम आणि निमंत्रीत कलाकारांचे दिनांक २९ व ३० सप्‍टेंबर रोजीचे कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील सभाकुंडच्‍या स्‍टेजवर तर दिनांक १ व २ ऑक्‍टोबर रोजीचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साई मंदिर समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.