अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील जांबुत खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना मे २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीस घारगाव पोलिसांनी आण्णा आप्पा गागरे (रा. जाधव, मांडवे, ता. पारनेर) यास अटक केली आहे. त्याला बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी संगमनेर न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सध्या शिक्षणासाठी संगमनेर तालुक्यातील जांबुत खुर्द याठिकाणी असणाऱ्या मावशीकडे राहाते. तिच्या मावशीचा जावई आण्णा आप्पा गागरे याने जबरदस्तीने या अल्पवयीन मुलीशी चार महिन्यांपासून संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला.

ती घाबरल्याने तिने झालेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. पण तिला उलट्या होऊ लागल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले होते. बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी तिने दिलेल्या जबाबावरुन पुणे याठिकाणी असणाऱ्या बंडगार्डन पोलिसांनी विविध कलमान्वये गु.रजि.नं. १०/२०१७ प्रमाणे गुन्हा दाखल करून घारगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.

घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्सार इनामदार, राजेंद्र लहांगी, संतोष खैरे यांनी राहुरी येथून गागरे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.